भजनी मालिका
← भजनांकडे परत

चारी वेद तुझ्या नांदती नगरीं । तेथें मी भिकारी काय वानूं

chari ved tujhya nandati nagarin | tethen mi bhikari kay vanun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चारी वेद तुझ्या नांदती नगरीं । तेथें मी भिकारी काय वानूं ॥१॥ वर्णितां पार नेणे चतुरानन । तेथें मी अज्ञान काय जाणें ॥२॥ अंगलग सेवक शेषाच्या सारिखा । तेथें माझ्या लेखा कोणीकडे ॥३॥ कैलासींचा राणा करितसे ध्यान । तेथें भ्रांत मन कोठें रिघे ॥४॥ इंद्रासहित देव जेथें ओळंगणें । तेथें दास्य करणें घडे कांहीं ॥५॥ नामा ह्मणे केशवा काय म्यां । करावें । तुझे पायीं रहावें कैशापरी ॥६॥