भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरणासीं शरण तुझिया जे येती । तेचि उतरती भवसिंधू

charanasin sharan tujhiya je yeti | techi utarati bhavasindhu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चरणासीं शरण तुझिया जे येती । तेचि उतरती भवसिंधू ॥१॥ लक्षुमीनें ज्यातें असे आराधिलें । ठेवीं तीं पाउलें स्तनावरी ॥२॥ आवडीनें शिवें मस्तकीं वंदिलें । ठेवीं तीं पाउलें स्तनावरी ॥३॥ नामा ह्मणे ऐशी करिताती स्तुती । शिंपीयेली क्षिती अश्रुपातें ॥४॥