भजनी मालिका
← भजनांकडे परत

चक्रतीर्थीं पाहा उभा तो गोपाळ । पुढें विणे टाळ वाजताती

chakratirthin paha ubha to gopal | pudhen vine tal vajatati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चक्रतीर्थीं पाहा उभा तो गोपाळ । पुढें विणे टाळ वाजताती ॥१॥ स्वर्गींहुनि पुष्पें वर्षती सुरवर । उभे ऋषीश्वर समुदायेंसी ॥२॥ आणिक वाद्यें तेथें वाजती अपार । जाती ज्ञानेश्वर समाधीसी ॥३॥ नामा म्हणे देवा चुकों नेदी संधी । पोहोचविताम सिद्धि बाळकासी ॥४॥