भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुद्धिहीन अति करितों हव्यास । उठती दद्देश नाना मतें

buddhihin ati kariton havyas | uthati daddesh nana maten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बुद्धिहीन अति करितों हव्यास । उठती दद्देश नाना मतें ॥१॥ एकापुढें एक नासोनियां जाती । सोशिली विपत्ति जन्ममरण ॥२॥ वासनेचें संगें बुडालों मी वायां । चुकवूं नको पायासवें भेटी ॥३॥ नामा म्हणे ऐसे गेले बहुतेक । वैकुंठनायका तारीं मज ॥४॥