भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मनिष्ठ तेव्हां स्थिरावला चित्तीं । अक्रूराचे गळती दोन्ही नेत्र

brahmanishtha tevhan sthiravala chittin | akrurache galati donhi netra

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्रह्मनिष्ठ तेव्हां स्थिरावला चित्तीं । अक्रूराचे गळती दोन्ही नेत्र ॥१॥ दहींदूधतूप भरिल्या कावडी । चालती तांतडी सकळीक ॥२॥ चिंतेनें व्यापिलें अक्रूराचें मन । काय वर्तमान होईल नेणें ॥३॥ नरनारी शोक करीती सकळ । दुराचारी खळ कंस आहे ॥४॥ मारगीं स्नानासी उतरे अक्रूर । रथावरी किशोर नंदजीचे ॥५॥ सोडोनियां घोडीं चालिला तांतडी । दिल्ही असे बुडी जळां-मध्यें ॥६॥ दावोनी कौतुक निरसी त्याचा धाक । सांगतसे शुक परिक्षिती ॥७॥ जुंपोनियां घोडीं चालिला सत्वर । लपे दिनकर नामा ह्मणे ॥८॥