भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुक्ति मुक्ति मागों तुज । तरी मज हांसती पूर्वज

bhukti mukti magon tuj | tari maj hansati purvaj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भुक्ति मुक्ति मागों तुज । तरी मज हांसती पूर्वज ॥१॥ मज प्रेम पढियें देवा । न मगें आन कांहीं सेवा ॥२॥ मोक्ष मागूं तुजप्रति । संत छलवादें हांसती ॥३॥ चाड धरीन ब्रह्मज्ञानीं । तरी मज व्यर्थ व्याली जननी ॥४॥ होऊं सिद्धीचा साधिता । दैवें सांडिलें तत्त्वता ॥५॥ नामा म्हण्ने कांहीं न मगें । उभ राहेन संतांमागें ॥६॥