भजनी मालिका
← भजनांकडे परत

भिऊनि निघिजे समर्थाचे पोटीं । विषयांची तो भेटी नको मज

bhiuni nighije samarthache potin | vishayanchi to bheti nako maj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भिऊनि निघिजे समर्थाचे पोटीं । विषयांची तो भेटी नको मज ॥१॥ तैसा मी शरण आलों रे केशवा । मज त्वां राखावें पायांतळीं ॥२॥ नको उदासीन राखों अभिमान । माझें आगमन विचारीं कां ॥३॥ तुझेनि होईल तेंच मी मागेन । न सोडीं चरण अहर्निशीं ॥४॥ अविद्या अपारा संचरली देवा । आम्हासि कुढावा नाहीं कोणी ॥५॥ देवा आतां मज नको गर्भवास । नामा विष्णुदास विनवितसे ॥६॥