भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवजलधि अगाध तरावया दुस्तर । रचिलें पंढरपूर चंद्रभागा

bhavajaladhi agadh taravaya dustar | rachilen pandharapur chandrabhaga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भवजलधि अगाध तरावया दुस्तर । रचिलें पंढरपूर चंद्रभागा ॥१॥ तारूं पंढरिनाथ मोलेंविण उतरितु । उगला असे तिष्ठतु वाट पाहे ॥२॥ बुडतयाचें भय नाहीं संसारीं । कलिमाजीं पंढरी नाव थोर ॥३॥ राव रंक दोन्हीं बैसवुनी वरी । उतरी पैलतीरीं भरंवसेनी ॥४॥ आठराही आवले जे नावेसि लागले । साही खण भरले मिरवताती ॥५॥ चौमुखीं वर्णितां नकळे याचा पार । वेदां अगोचर सहस्त्रमुखा ॥५॥ सडियातें कांसे लावित आपण । कुटुंबिये जाण नावेवारी ॥७॥ प्रेमाचे पेटे बांधोनियां पोटीं । उतरी जगजेठी पैलपारु ॥८॥ आप आंगें उघाडी बुडत्यातें कडे काढी । ऐसे लक्षकोडी तारियले ॥९॥ सहस्त्र नाम पेटे बांधे मज मोटींज । तरी जगजेठी लावी कांसे ॥१०॥ आदि करोनी सर्वही तारिले । उतरूनि तारिले पैलतिरीं ॥११॥ ऐसे पक्षी कीट गुल्मल तारिले । खेचरा विसा म्हणे तारी मातें पुंडलिक ॥१२॥