भजनी मालिका
← भजनांकडे परत

भांडारी येऊनि करिती प्रार्थना । द्विजांसी दक्षणा काय द्यावी

bhandari yeuni kariti prarthana | dvijansi dakshana kay dyavi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भांडारी येऊनि करिती प्रार्थना । द्विजांसी दक्षणा काय द्यावी ॥१॥ जया लागे जितुकें तितुकें त्यानें घ्यावें । तुह्मीं न रहावें उभें तेथें ॥२॥ धांवताती तेव्हां बिप्र सकळिक । एकाबरीं एक पड-ताती ॥३॥ करूं नका घाई सर्वांसी पुरेल । न राहे दुर्बळ यांत कोणी ॥४॥ नामा म्हणे ऐसें धन वाटी राजा । सुखी केल्या प्रजा सकळीक ॥५॥