भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीविणें जिणें जळो लजिरवाणें । संसार भोगणें दु:खरूप

bhaktivinen jinen jalo lajiravanen | sansar bhoganen du:kharup

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्तीविणें जिणें जळो लजिरवाणें । संसार भोगणें दु:खरूप ॥१॥ एक एक योनि कोटि कोटि फेरा । मनुष्य देहवारा मग लागे ॥२॥ वीस लक्ष योनि वृक्षामध्यें ध्याव्या । जळचरीं भोगाव्या मव लक्ष ॥३॥ अकरा लक्ष योनी किरडामध्यें घ्याव्या । दश लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्यें ॥४॥ तीस लक्ष योनि पशूंचिये घरीं । मानवाभीत्तरीं चारी लक्ष ॥५॥ नामा ह्मणे तेव्हां नरदेह या नरा । तयानें मातेरा केला मूढें ॥६॥