भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीसाठीं याति नाहीं । नाहीं तयासी ते सोई

bhaktisathin yati nahin | nahin tayasi te soi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्तीसाठीं याति नाहीं । नाहीं तयासी ते सोई ॥१॥ रोहिदास तो चांभार । त्याचा करी कारभार ॥२॥ जो कां भक्त यातिहीन । देव करी त्याचा मान ॥३॥ त्यासी भक्ताचा आधार । वाट पाहे निरंतर ॥४॥ जनी म्हणे भक्तासाठीं । विठो सदा गोण्या लोटी ॥५॥