भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांसाठी देव अवतार धरी । कृपाळु श्रीहरि साच खरा

bhaktansathi dev avatar dhari | krupalu shrihari sach khara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्तांसाठी देव अवतार धरी । कृपाळु श्रीहरि साच खरा ॥१॥ तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । उभा विटेवरी पांडुरंग ॥२॥ ब्रह्मयाचे वेद चोरी शंखासुर । मत्स्य अवतार तयालागीं ॥३॥ समुद्र मंथनीं मंदर बुडाला । कूर्मरूप झाला तयेवेळीं ॥४॥ हिर-ण्याक्ष धरा नेतां रसातळ । वराहरूपें त्याला वधियेलें ॥५॥ प्रल्हा-दासी पिता गांजी नानापरी । स्तंभीं नरहरी प्रगटला ॥६॥ देव-काजीं झाला वामन भूतळीं । बळीसी पाताळीं घातियेला ॥७॥ भूमिभार झाला क्षत्रियांचें कुळ । केलेंसे निर्भूळ परशुरामें ॥८॥ सीतेचिया काजा रावण मर्दिला । सूर्यवंशीं झाला रामचंद्र ॥९॥ गोकुळीं जन्मला श्रीकृष्ण आठवा । होऊनि पांडवां साह्यकारीं ॥१०॥ व्रतभंगासाठीं बौद्ध अवतार । झाला दिगंबर अवनिये ॥११॥ कलंकि अवतार होणार श्रीहरि । तेव्हां पृथ्वीवरी तृण न उरे ॥१२॥ नामा ह्मणे तुझे अनंत अवतार । तेथें मी पामर काय वर्णूं ॥१३॥