भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांची आवडी मोठी त्या देवासी । सद्‌भक्तिप्रेमासी लांचावला

bhaktanchi avadi mothi tya devasi | sad‌bhaktipremasi lanchavala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्तांची आवडी मोठी त्या देवासी । सद्‌भक्तिप्रेमासी लांचावला ॥१॥ काय सांगूं आतां तयांचें तयांचें कौतुक । जेथें ब्रह्यादिक स्तब्धा ठेले ॥२॥ गज आणि गणिका भिल्लिणी कुंटिणी । नेल्या त्या विमानीं बैसोनियां ॥३॥ अजामीळ खळ कोळी तो वाल्मिक । तारिले अनेक एकसरां ॥४॥ धर्माचिये घर्रीं उच्छिष्ट काढी । जाहाला बराडी देवराव ॥५॥ नामा म्हणे कांहीं मागेना तो देव । मुख्य पाहे भाव दृढ त्याचा ॥६॥