भजनी मालिका
← भजनांकडे परत

भागलासि देवा धांव धांवणिया । दाखविसी पायां पांडुरंगा

bhagalasi deva dhanv dhanvaniya | dakhavisi payan panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भागलासि देवा धांव धांवणिया । दाखविसी पायां पांडुरंगा ॥१॥ गजेंद्र गणिका तुम्हां श्रमविलें । मी काय उगलें परदेशी ॥२॥ सोळा सहस्त्र आणि गोपी त्या उद्धरती । माझी कींव चित्तीं कां वा नये ॥३॥ नामा म्हणे आम्हां पुरे तुझा संग । वारंवार मगा वारी कोण ॥४॥