भजनी मालिका
← भजनांकडे परत

बेडूक म्हणजे चिखलाचा भोक्ता । क्षीर सांडूनि रक्ता गोचीड झोंबे

beduk mhanaje chikhalacha bhokta | kshir sanduni rakta gochid jhombe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बेडूक म्हणजे चिखलाचा भोक्ता । क्षीर सांडूनि रक्ता गोचीड झोंबे ॥१॥ जयाची वासना तयासीच गोड । प्रेमसुखचाड नाहीं तया ॥२॥ वांझ ह्मणे मी वाढवितेम जौंझार । उघडावया कैवाड नाहीं कोणी ॥३॥ अस्वलाचें तेल माखियलें कानीं । तें ह्मणे रानीं थोर सुख ॥४॥ स्वामीचिया कानी खोविली लेखणी । ते घेत असे धणी घरोघर ॥५॥ गाढवासी लविली तूप पोळी डाज । भुंके आळोआळ लाज नाहीं ॥६॥ सूफरा कस्तूरी चंदन लविला । तो तेथोनि पळाला विष्टा खाया ॥७॥ नामा ह्मणे माझें मन हें वोळलें । धरिलासे गोपाळ सोडीचिना ॥८॥