भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळकाच्या बोला राजा भांबावला । म्हणे झालें याला ज्ञानगम्य

balakachya bola raja bhambavala | mhane jhalen yala dnyanagamya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाळकाच्या बोला राजा भांबावला । म्हणे झालें याला ज्ञानगम्य ॥१॥ शांती याचे अंगीं बाणलीसे नीट । तेणें नेटेपाटे पुढारला ॥२॥ मी तों झालों वांयां कामाचा किंकर । केला म्यां अव्हेर बाळकाचा ॥३॥ कीर्ति हे त्यागोनी दुर्दशा आणिली । ऐसी होऊं सरली बुद्धि फिकी ॥४॥ नामा म्हणे राजा लाजला चित्तांत । प्राणावीण प्रेत तयापरी ॥५॥