भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळक जाणेना मातेसी

balak janena matesi

रचनाकार: संत रामदास · अभंग
बाळक जाणेना मातेसी । तिचे मन तयापखशीं तैसा देव हा दयाळ । करी भक्तांचा सांभाळ धेनु वत्साचेनि लागें। धांवें त्यांचे मागें मागें पक्षी वेंधतसे गगन । पिलांपाशी त्याचें मन मत्स्यआठवितां पाळी । कूर्म द्रुष्टीनें सांभाळी रामीरामदास म्हणे । मायाजाळाचीं लक्षणें।