भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसायासी गेलों पितीयाचे अंकीं । उठविलें एकी माउलीनें

baisayasi gelon pitiyache ankin | uthavilen eki maulinen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बैसायासी गेलों पितीयाचे अंकीं । उठविलें एकी माउलीनें ॥१॥ सरेना सरेना कोणी उठवीना । ऐसा ठाव जाणा वांछितसे ॥२॥ उपाय न कळे मागावें कोणासी । भावना आपैसी उठावली ॥३॥ नामा म्हणे शब्द ऐके देवऋषी । मग त्या बाळकासी आश्वासीते ॥४॥