भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाई कशाच्या नवबता । पुत्र झाला दशरथा

bai kashachya navabata | putra jhala dasharatha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाई कशाच्या नवबता । पुत्र झाला दशरथा ॥१॥ चला चला तेथें जाऊं । कौसल्येचें बाळ पाहूं ॥२॥ नवसें बहुत । तिशीं पावला भगवंत ॥३॥ घ्याग घ्याग त्वरें वाण । झगा फडकी पेहरण ॥४॥ करूनि शृंगारा । येती राजयाच्या घरा ॥५॥ पाहतां सुकुमार सांवळा । लवूं विसरला डोळा ॥६॥ सार्थक जन्माचें । नामा ह्मणे झालें त्यांचे ॥७॥