भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवतरले हरी नंदाचे मंदिरीं । जाणोनियां सुरीं तोषि-जेत

avatarale hari nandache mandirin | janoniyan surin toshi-jet

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवतरले हरी नंदाचे मंदिरीं । जाणोनियां सुरीं तोषि-जेत ॥१॥ आतां गेली सर्व आमची चिंता । भूभार सर्वथा उतरील ॥२॥ यज्ञ दान तप होतील अपार । आमुचा आहार आह्मांलागीं ॥३॥ दुष्ट दुराचारी मातले राक्षस । यांचा करिल नाश क्षणामाजी ॥४॥ नीति न्याय धर्म वाढेल अपार । भाविकांसी पार उतरील ॥५॥