भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघी हे पंढरी सुखाची वोवरी । अवघ्या घरोघरीं ब्रह्मानंद

avaghi he pandhari sukhachi vovari | avaghya gharogharin brahmanand

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघी हे पंढरी सुखाची वोवरी । अवघ्या घरोघरीं ब्रह्मानंद ॥१॥ अवघा हा विठ्ठल सुखाचाचि आहे । अनुसरे तो लाहे सर्व सुख ॥२॥ पहावा अवघा नयनीं ऐकावा श्रवणीं । अ-वघा घ्यावा ध्यानीं अवघ्या मनें ॥३॥ अवघिये आवडी अवघा गावा गीतीं । अवघा सर्वांभूतीं तोचि आहे ॥४॥ अवघा हा जाणावा अवघा हा मानावा । अवघा वाखाणावा अवघी वाता ॥५॥ अवघा ओळखोनि अवघा गिळिजे मनें । अवघा हाचि होणें ह्मणे नामा ॥६॥