भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें हें पवित्र पांडुरंग क्षेत्र । सुखाचि सर्वत्र भरलें असे

avaghen hen pavitra pandurang kshetra | sukhachi sarvatra bharalen ase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघें हें पवित्र पांडुरंग क्षेत्र । सुखाचि सर्वत्र भरलें असे ॥१॥ अवघा हा विठठल गीतीं गातां । अवघें पुरवी कोड नामें एकें ॥२॥ अवघें जे सांडोनि अनुसरले यातें । अवघें देतो त्यांतें आपुलें प्रेम ॥३॥ अवघी चित्तवृत्ति ठेविती याच्या पायीं । ह्यातें अवघ्या बाहीं आलिंगितो ॥४॥ अवघें आपुलें मन दिल्हें जिहीं यातें । असे त्यांसांगातें मागें पुढें ॥५॥ अवघ्यासि अनुरला अवघेंचि विसरला । अवघा नामा झाला सुखरूप ॥६॥