भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे ते संसारीं जाणावे ते धन्य । ज्यांचें प्रेम पूर्ण पांडुरंगीं

avaghe te sansarin janave te dhanya | jyanchen prem purna pandurangin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघे ते संसारीं जाणावे ते धन्य । ज्यांचें प्रेम पूर्ण पांडुरंगीं ॥१॥ अवघे ते दैवाचे विठ्ठल ह्मणती वाचे । अवघें कुळ त्याचें पुण्यरूप ॥२॥ अवध्यारूपीं एक विठ्ठल भाविती । अवघ्या मनें भजती अवघेपणें ॥३॥ अवघे मिथ्या जाणोनि अवघिया वि-ठ्ठले । अवघे विनटले विठ्ठलपायीं ॥४॥ अवघे पूर्ण बोधें भावें प्रेमें प्रीती । ध्यानीं गीतीं केशिराज ॥५॥ अवघा हा विठ्ठलु भोगूं दिनराती । वोळंगें किंकरवृत्ति नामा त्यासी ॥६॥