भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडे जें जीवा तें पंढरिये उभें । पुंडलिकें लोभें राह-त्रिलें

avade jen jiva ten pandhariye ubhen | pundaliken lobhen rah-trilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आवडे जें जीवा तें पंढरिये उभें । पुंडलिकें लोभें राह-त्रिलें ॥१॥ जोडूनि जाऊलें ठेवियलीं इटे । करद्बय गोमटें कटावरी ॥२॥ कान मुख डोळे न ह्मणती पुरे । सेवितां न पुरे धनी मना ॥३॥ गोड लागे पोट न भरे न धाय । भुकेलीच राहे भूक सदा ॥४॥ नामा ह्मणे संतसंगती विश्वास । घेऊं अनुभवास फार फार ॥५॥