भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवचट देह लाधला प्राणिया । भक्तिवीण वांयां गेला जाण

avachat deh ladhala praniya | bhaktivin vanyan gela jan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवचट देह लाधला प्राणिया । भक्तिवीण वांयां गेला जाण ॥१॥ धिक्‍ त्याचें जिणें जन्मला कासया । जरी पंढरिराया विसरला ॥२॥ रामनामीं रत नव्हेचि बापुडें । जननिये सांकडें घातलें तेणें ॥३॥ ऐसा जन्म नको नको गा श्रीरामा । ह्मने तुझा नामा विष्णुदास ॥४॥