भजनी मालिका
← भजनांकडे परत

औट हात घोंगडें दिधलें हरी । पांधरलों नाहीं घणीवरी

aut hat ghongaden didhalen hari | pandharalon nahin ghanivari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
औट हात घोंगडें दिधलें हरी । पांधरलों नाहीं घणीवरी ॥१॥ माझें घोंगडें कृष्णा गा जतन करीं । नागविलें थोरीं पांचाजणीं ॥२॥ साठी तीनशें दसोडी । पदरीं औट कोडी रोमावळी ॥३॥ बहात्तर गांठी सोळा फुंदणी । घोंगदी दाटणी होत असे ॥४॥ त्निगुणी दोरिया जाणा । घोंगडें पांघरवी पंढरीराणा ॥५॥ त्यांचें घोंगडें त्यासी दिधलें । उघडें नामे भक्ती पांघरविलें ॥६॥