भजनी मालिका
← भजनांकडे परत

अठ्ठाविस युगें उभा विटेवरी । मुद्रा अगोचरीं लावूनियां

aththavis yugen ubha vitevari | mudra agocharin lavuniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अठ्ठाविस युगें उभा विटेवरी । मुद्रा अगोचरीं लावूनियां ॥१॥ ध्यान विसर्जन केधवां करिसी । नेणवे कोणासी ब्रह्मादिकां ॥२॥ पहातां तुजकडे माझें मीपण उडे । भेदाचें सांकडें हारपलें ॥३॥ तुजपाशीं असतां मुकिजे जीवित्वा । ठकले तत्त्वतां नेणों किती ॥४॥ नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहें । मन पायीं राहे ऐसें कीजे ॥५॥