भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां येतों स्वामी आम्ही । कृपा असों द्यावी तुम्ही

atan yeton svami amhi | krupa ason dyavi tumhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आतां येतों स्वामी आम्ही । कृपा असों द्यावी तुम्ही ॥१॥ बहु दिवस सांभाळ केला । पुन्हा जन्म नाहीं दिला ॥२॥ थोर सुकृताच्या राशी । तुमचे पाय मजपाशीं ॥३॥ ऐसा नामदेव बोले । ऐकोनी दासी जनी डोले ॥४॥