भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां वाट पाहूं किती । देवा रुक्माईच्या पती

atan vat pahun kiti | deva rukmaichya pati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आतां वाट पाहूं किती । देवा रुक्माईच्या पती ॥१॥ येईं येईं पांडुरंगे । भेटी देईं मजसंगें ॥२॥ मी बा बुडतें बहु जळीं । सांग बरवी ब्रीदावळी ॥३॥ राग न धरावा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥