भजनी मालिका
← भजनांकडे परत

आषाढी कार्तिकी हेचि आह्मां सुगी । शोभा पांडुरंगीं घनवटे

ashadhi kartiki hechi ahman sugi | shobha pandurangin ghanavate

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आषाढी कार्तिकी हेचि आह्मां सुगी । शोभा पांडुरंगीं घनवटे ॥१॥ संतांचीं दर्शनें हेंचि पीक जाण । देतां आलिंगन देह निवे ॥२॥ देह निव्वे किती नवल सांगावें । जीवासी दुणावे ब्रह्मानंद ॥३॥ नामा म्हणे यासी मूळ पांडुरंग । त्याचेनि अव्यंग सुख आह्मां ॥४॥