भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशा तृष्णा व्याघ्र देखोनियां डोळा । जालेंसे व्याकुळ चित्त माझें

asha trushna vyaghra dekhoniyan dola | jalense vyakul chitta majhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आशा तृष्णा व्याघ्र देखोनियां डोळा । जालेंसे व्याकुळ चित्त माझें ॥१॥ पावें गा विठोबा पावेंज गा विठोबा । पावें गा विठोबा मायबापा ॥२॥ तूं भक्तकैवारी कृपाळुवा हरि । येईं गा झडकरी देवराया ॥३॥ नामा म्हणे आन नाहीं तुजवांचोनि । जनक जननी केशिराजा ॥४॥