भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशा तृष्णा माया नाहीं लिथाडिल्या । ह्मणावा तो भला कासयानें

asha trushna maya nahin lithadilya | hmanava to bhala kasayanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आशा तृष्णा माया नाहीं लिथाडिल्या । ह्मणावा तो भला कासयानें ॥१॥ अमृत सेवितां मृत्यु पळे दुरी । सुख होय तरीं तेंचि नाम ॥२॥ तेव्हां कोणी तरी धरावा सत्संग । होय पांडुरंग प्राप्ति सर्वां ॥३॥ अविश्वासी नर सर्वस्व पतीता । तारिसी अनंता ह्मणे नामा ॥४॥