भजनी मालिका
← भजनांकडे परत

अपत्याचें हित किजे त्या जनकें । जरी वेडें मुकें जालें देख

apatyachen hit kije tya janaken | jari veden muken jalen dekh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अपत्याचें हित किजे त्या जनकें । जरी वेडें मुकें जालें देख ॥१॥ तैसें मी पोसणें तुझें जिवलग । अंतरींची सांग खूण कांहीं ॥२॥ राखीन मी नांव तुझें सर्वभावें । चित्त वित्त बळी देईन पायीं ॥३॥ जरी दैवहीन म्हणसी मजला । तरी लाज कवणाला म्हणे नामा ॥४॥