भजनी मालिका
← भजनांकडे परत

आप तेज वायु पृथ्वी आणि गगन । त्यांचें बा केलें श-रीरनिधान

ap tej vayu pruthvi ani gagan | tyanchen ba kelen sha-riranidhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आप तेज वायु पृथ्वी आणि गगन । त्यांचें बा केलें श-रीरनिधान ॥१॥ त्यामाजीं घातलें मन पवन । पिंडब्रह्मांड केली रचना ॥२॥ काय सांगों तुझी करणी नारायणा । वेदपारायणा केशिराजा ॥३॥ पृथ्वीवरी तीर्थें आहेत अपार । परि पंढरीची सर एका नाहीं ॥४॥ जन्मोजन्मींच्या पातका दरारा । चुके येरझारा एके खेपे ॥५॥ ब्रह्म-ज्ञानेंवीन मोक्ष आहे भूतीं । वाचेसि ह्मणती विठ्ठलनाम ॥६॥ बेचाळी-सांसहित जातीत वैकुंठा । नामा ह्मणे भेटा विठ्ठलदेवा ॥७॥