भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरयामीं जाणे सर्वोचा जो साक्षी । रडताती पक्षी मजसाठीं

antarayamin jane sarvocha jo sakshi | radatati pakshi majasathin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अंतरयामीं जाणे सर्वोचा जो साक्षी । रडताती पक्षी मजसाठीं ॥१॥ पाहूनियां प्रेमा भुलला गोविंद । रडतसे मंदमंद तेव्हां ॥२॥ उच्चारितां नामें तारताती पापी । न विसरती गोपी कांहीं केल्या ॥३॥ विश्वाचा जो आत्मा शोक तया नाहीं । भुल-लासे तोहि भक्तीप्रेमें ॥४॥ चिंतेमें व्यापिला तेव्हां ऋषिकेशी । पाठवूं कोणासी गोकुळांत ॥५॥ तयेवेळीं पुढें देखिलें उद्धवा । बाहा-तसे तेव्हां तयालागीं ॥६॥ नामा ह्मणे आतां करील एकांत । सावधान चित्त अवधारा ॥७॥