भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतर बाहेर भाजूं आम्ही कुंभ । भरू निरालंब सगळेची

antar baher bhajun amhi kumbh | bharu niralamb sagalechi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अंतर बाहेर भाजूं आम्ही कुंभ । भरू निरालंब सगळेची ॥१॥ अहं सोहं उर्ध्व लाउनी फुंकणी । नेत्रद्वारें फुंकुनी जाळ करूं ॥२॥ जीवित्व काढुनि शिव घडूं अंगा । प्रिय पांडुरंग आवडेला ॥३॥ म्हणे मुक्ताबाई पळायाचें पाही । आसन स्थिर नाहीं नामयाचें ॥४॥