भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचे वंशीं आत्माराम

amuche vanshin atmaram

रचनाकार: संत रामदास · अभंग
आमुचे वंशीं आत्माराम । एका पिंडींचे निष्काम रामदास्य आलें हातां। अवघा वंश धन्य आतां बापें केली उपार्जना । आम्ही लाधलों त्या धना बंधु अभिलाषा टेकला । वांटा घेउनि भिन्न जाला रामीरामदासीं स्थिति । पाहिली वडिलांची रीति।