भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे

amrutahuni god nam tujhen deva | man majhen keshava kan va neghe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥ सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥ कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें । मन हें भुललें विषयसुखा ॥३॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥