भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृत टाकुन कांजीची आवडी । साजेना झोपडी काय त्याला

amrut takun kanjichi avadi | sajena jhopadi kay tyala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अमृत टाकुन कांजीची आवडी । साजेना झोपडी काय त्याला ॥१॥ खरासी अखंड गंगेचें हो स्नान । गेलें वायांविण जिणें त्याचें ॥२॥ पोवळयापरिस दिसती रानगुंजा । श्रृंगाराच्या काजा न येती त्या ॥३॥ आनारा परिस चोखट इंद्रावन । चवी कडुपण हीन त्याचें ॥४॥ रंगाची बाहुली दिसती साजिरी । बेगडाचे परी नग ल्याली ॥५॥ म्हणे मुक्ताबाई पुरे तें दर्शन । गुरुविण संतपण आहे कोठें ॥६॥