भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं कीर्तन कुळवाडी । आणिक नाहीं उदीम जोडी

amhin kirtan kulavadi | anik nahin udim jodi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्हीं कीर्तन कुळवाडी । आणिक नाहीं उदीम जोडी ॥१॥ वाचा पिकली पिकली । हरिनामाची वृष्टी झाली ॥२॥ दशमी एकादशीच्या दिवशीं । झाल्या कैवल्याच्या राशी ॥३॥ संत म्हणती नामा भला । हरिनामाचा सुकाळ झाला ॥४॥