भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही विठोबाचे दूत । यम आणूं शरणागत

amhi vithobache dut | yam anun sharanagat

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्ही विठोबाचे दूत । यम आणूं शरणागत ॥१॥ मुखें नाम हातें टाळी । महापापा करुं होळी ॥२॥ करुं हरिनामाचा घोष । कुंभपाक पाडूं ओस ॥३॥ करुं हरीकथा कीर्तन । तोडूं यमाचें बंधन ॥४॥ एवढा प्रताप नामाचा । रिघ नव्हे कळिकाळाचा ॥५॥ ऐसा नामा यशवंत । विठोबाचा शरणागत ॥६॥