भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक । देखोनियां सुख वैकुंठींचें

amhi svarga lok manun jaisa ok | dekhoniyan sukh vaikunthinchen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक । देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥ नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस विठोपाय़ीं ॥२॥ न लगे संतति धन आणि मान । एक करणें ध्यान विठोबाचें ॥३॥ सत्य कीं मायी आमुचें बोलणें । तुमची तुन्ही आण सांगा हरी ॥४॥ जीवभाव आम्ही सांडूं ओंवाळूनि । म्हणे रासी जनी नामयाची ॥५॥