भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरीं

amhi dekhili pandhari | sachchidanand pailatirin

रचनाकार: संत रामदास · अभंग
आम्ही देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरीं ।। भावभक्ति श्रवण मनन । निदिध्यास साक्षात्कारपण ।। चिच्छक्ति धर्मनदी । तरलों ब्ह्मास्मिबुध्दि ।। तेथिंचा अहंकार तेंचि पोंवळी । त्यजोनी प्रवेशलों राउळीं ।। रामदासी दर्शन जालें । आत्म्या विठ्ठलातें देखिलें ।।