भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हा ये प्रपंचीं कोणी नाहीं सखा

amha ye prapanchin koni nahin sakha

रचनाकार: संत रामदास · अभंग
आम्हा ये प्रपंचीं कोणी नाहीं सखा। एका रघुनायकावांचोनिया विद्या वैभव धन मज क्रुपणाचें। जीवन जीवांचे आत्मारामु आकाश अवचितें जरि कोसळेल। मज तेथें राखील आत्मारामु आपिंगिलें मज श्रीरामसमर्थे । ब्रह्मांड पालथें घालूं शके वक्रदृष्टि पाहतां भरिल त्याचा घोंट। काळाचेंहि पोट फाडू शके रामदास म्हणे मी शरणागत त्याचा। आधार सकळांचा मुक्त केला।