भजनी मालिका
← भजनांकडे परत

अल्याड पल्याड पताकांचे भार । मध्यें मनोहर इंद्राहणी

alyad palyad patakanche bhar | madhyen manohar indrahani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अल्याड पल्याड पताकांचे भार । मध्यें मनोहर इंद्राहणी ॥१॥ पिवळ्या पारव्या आणिक हिरव्या । नीळवर्ण सार्‍या लखलखित ॥२॥ जरी जर्तातरी जाल्या रानभरी । विजा त्यावरी खेळताती ॥३॥ सर्पाकार दंड तारांगणावाणी । पताका तिकोनी दाटताती ॥४॥ नामा म्हणे तेथें पताकांचे भार । केव्हडें भाग्य थोर ज्ञानोबाचें ॥५॥