भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलेनो संसारा सोडवणें करा । शरण जा उदारा पांडुरंगा

aleno sansara sodavanen kara | sharan ja udara panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आलेनो संसारा सोडवणें करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥ प्रपंच न सरे कदा कल्पकोडी । वासनेचि बेडी पडे पायीं ॥२॥ व्यर्थ मायादेवी गर्भवास गोची । नश्वर भोगाची नाना-योनी ॥३॥ नामा म्हणे पहा विचारूनि मनीं । स्मरावा निर्वाणीं पांडुरंग ॥४॥