भजनी मालिका
← भजनांकडे परत

आले वैष्णवांचे भार । दिले हरिनाम नगार

ale vaishnavanche bhar | dile harinam nagar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आले वैष्णवांचे भार । दिले हरिनाम नगार ॥१॥ अवघी दुमदुमली पंढरी । कडकडाट गरुडपारीं ॥२॥ टाळ मृदंग धुमाळी । रंगणीं नाचे वनमाळी ॥३॥ ऐसा आनंद सोहळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥