भजनी मालिका
← भजनांकडे परत

अलक्ष्या अच्युता सख्या भक्तराया । तूंचि देवराया पांडुरंगा

alakshya achyuta sakhya bhaktaraya | tunchi devaraya panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अलक्ष्या अच्युता सख्या भक्तराया । तूंचि देवराया पांडुरंगा ॥१॥ परात्परतर पार नेणे ब्रह्मा । तूंचि निजधाम स्वयें देसी ॥२॥ विश्वामित्रासाठीं विलंब न करीं । बळिचिया द्वारीं भृत्य होती ॥३॥ नामा ह्मणे तुझी माव नेणे कोणी । धांवें चक्रपाणी त्वरें नेटें ॥४॥