भजनी मालिका
← भजनांकडे परत

अळकापुरवासिनी समिप इंद्रायणी । पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें

alakapuravasini samip indrayani | purvesi vahini pravah tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अळकापुरवासिनी समिप इंद्रायणी । पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें ॥१॥ ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं । धांवोनियां येई दुडदुडां ॥२॥ बहु कासाविस होतो माझा जीव । कनवाळ्याची कींव येऊं द्यावी ॥३॥ नामयाची जनी म्हणावी आपुली । पायीं सांभाळिली मायमापें ॥४॥