भजनी मालिका
← भजनांकडे परत

आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ति । जे मोक्ष विश्रांति मुमुक्षूंची

ala dvaravati pahili krushnamurti | je moksha vishranti mumukshunchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ति । जे मोक्ष विश्रांति मुमुक्षूंची ॥१॥ धरी मछावतार केला शंखोद्वार । देव मुक्तिमाहेर पांथिकाचें ॥२॥ तेथोनि सत्वर आला पिंडारका । मंगळहडीहुनी द्वारका देखियेली ॥३॥ सुवर्णाची नगरी ब्राह्मणा दिधली । ते पुरी पाहिली सुदामयाची ॥४॥ मंडपाकार शोभे तो माधव । रुक्मिणी विवाहो जाला जेथें ॥५॥ संपादुनी गेला अवतारकृत्य । तें भालुकातीर्थ देखियेलें ॥६॥ पश्चिमे प्रभासलिंग देखियेलें । सोरटी वंदिलें सोमनाथा ॥७॥ मुचकुंडाची गुंफा काळ्यवन उभा । विश्रांती पद्मनाभा धवलपुरी ॥८॥ मार्गींचीं तीर्थं करुनी समस्तें । आला शक्ति जेथें सप्तशृंगा ॥९॥ अरुणा वरुणा प्राची गोदावरी । ते कपाळेश्वरी पूजा केली ॥१०॥ पुढें ज्योतिलिंग देखिलें त्र्यंबक । कुशावर्तीं उदक स्वीकारिलें ॥११॥ वंदूनिया गंगाद्वार सव्य ब्रह्मगिरि । मग भीमाशंकरी आनंदला ॥१२॥ देखोनियां भीमा आठवे पंढरी । विठठल अंतरीं पांडुरंग ॥१३॥